आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याने नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी शाम अशोक निकम (रा. शिंगणापूर, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृजेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (वय 42, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. वृजेंद्रकुमार सिंह यांची ‘रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा’ कंपनी आहे. या कंपनीकडून खेड-सिन्नर, म्हसवड-पिलिव्ह, कुर्डुवाडी-पंढरपूर, सातारा-रहिमतपूर या मार्गाचे काम करण्यात आले. 2016 ते 2021 या कालवधीत निकम कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होता. निकम याने डिझेल, खडी, डांबर तसेच अन्य साहित्याचा अपहार करुन कंपनीची नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सिंह यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस मोहिते तपास करत आहेत.
मतिमंद व्यक्तींच्या पुनर्वसनासंदर्भातील
अभ्यासक्रम नववर्षापासून
मतिमंद व्यक्तींच्या पुनर्वसनाला नवी दिशा देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवक्षितिज संस्था यांच्या वतीने काळजीवाहक आणि केंद्र प्रमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. 1 जानेवारी पासून या अभ्यासक्रमास सुरवात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी दिली. काळजीवाहक (केअर गिव्हर) आणि केंद्र प्रमुख असे दोन अभ्यासक्रम राहणार असून ते अनुक्रमे तीन व सहा महिन्याचे असणार आहे. काळजीवाहक प्रशिक्षणासाठी दहावी उत्तीर्ण अथवा एक वर्षांचा अशा संस्थांमधील अनुभव आणि केंद्र प्रमुख प्रशिक्षणासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर अथवा अशा संस्थांमधील दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे. सुरवातीस हा अभ्यासक्रम मराठीत असून येत्या काळात इंग्रजीतूनही हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नवक्षितीज संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांनी सोमवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.