आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा कंपनीत 2016 ते 17 पर्यंत प्रकल्प अधिकारी असलेल्या एकाने कंपनीची 9 कोटी 8 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शाम अशोक निकम (रा. शिंगणापुर, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबात वृजेंद्रकुकार इंद्रदेव सिंहग (42, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी यांची रोडवे सोल्युशन इंडया इन्फ्रा नावाची कंपनी आहे. त्यात निकम हा प्रोजक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. काम करत असताना खेड-सिन्नर बायपास, म्हसवड-पिलीव्ह, पंढरपूर, कुर्डवाडी-पंढरपुर, सातारा-रहिमतपुर अशा साईटवर काम करत असतना त्याने डिझेल, डांबर, लोखंड खंडी, बोल्डर याच्यात तब्बल 9 कोटी 8 लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कामावरून काढल्याने ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला मारहाण
कंपनीच्या मालकाने पत्नीला आरडा ओरड करून कामावरून टाकल्याच्या रागतून संबंधीत महिलेच्या पतीने कंपनीच्या मालकाचा पाठलाग करून मित्राच्या मदतीने त्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. तर भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या कंपनीच्या मालकाच्या पत्नीला मारहाण करून हात फ्रॅक्चर केला म्हणून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान मारूती मोडवे (रा. पवार हॉस्पीटल जवळ, बालाजीनगर,पुणे) आणि सागर गाढवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार तीन डिसेंबर रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
शिक्षकाकडून काचेच्या बाटलीने मारहाण
उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलीच्या शिक्षकाने काचेच्या बाटलीने मारहाण करून एका महिलेला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात निखील सुनिल संघवी (31, रा. कसबा पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका 36 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. 2 डिसेंबर रोजी कसबा पेठेतील धारणीवाडा येथे हा प्रकार घडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.