आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपघात झाल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावून फोन पेसह गुगल पेद्वारे ऑनलाईन लुट करणार्य सराईत टोळीचा दत्तवाडी पोलिसांनीन पर्दापाश केला. टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून एका आरोपीने अशाप्रकारे तब्बल ४० जणांकडून ऑनलाईन रक्कम घेतली.
इरफान इस्माईल सय्यद (वय ३० रा. गणेश चौक, माळवाडी, हडपसर), शरद ऊर्फ डॅनी रावसाहेब आहिरे (वय २६ रा. म्हाळुंगे-नांदे, चांदे रोड) आणि सविता लक्ष्मण खांडेकर ( रा. गोपाळपट्टी मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केतनकुमार होवाळ (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे.
केतनकुमार दुचाकीवरून १० डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास कामावरून घरी चालले होते. त्यावेळी सिंहगड रस्ता परिसरात टोळक्याने त्यांना अडवून ‘तुझ्याकडुन मागे दोन अॅक्सीडेंट झाले आहेत. त्यासाठी ४० हजार रूपये दे, अशी धमकी देत फोन पेवरून २० हजार आणि एटीएमद्वारे २० हजारांची लुट केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासाला गती दिली. त्यावेळी आरोपी हे हडपसरमधील सून सराईत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी बंडगार्डन, विश्रामबाग, वानवडी, हडपसर, मुंढव्यासह इतर भागात गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त सुहैल शर्मा, एसीपी सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, किशोर वळे, दयानंद तेलंगे- पाटील, सद्दाम शेख, रेवणनाथ जाधव, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी, प्रमोद भोसले, नवनाथ भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, अमित चिव्हे, आणि यांनी केली.
बँकखात्यात ९ लाख अन् ४० जणांकडून घेतली रक्कम
मुख्य आरोपी इरफान सय्यद सराईत असून त्याच्याविरूद्ध दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न अशाप्रकारे गुन्हे केले आहेत. त्यांच्या बँकखात्यामध्ये एका वर्षात ९ लाख रूपये विविध युपीआय अकाउंटवरून आले आहेत. त्याने साथीदारांच्या मदतीने ४० हून अधिक नागरिकांकडून अशाप्रकारे बतावणी करीत धमकीने रक्कम उकळल्याचे शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.