आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण केले जात आहे, रोहित पवार यांचा भाजपवर आरोप

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिस सक्षम, ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील - रोहित पवार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाजपने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. यावरून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी जोरदार राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जात असल्याचे ही रोहित म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कुणालाही घाबरत नाही. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये प्रोटोकॉल पाळला जावा असे वाटते. मात्र सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावे लागले. यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.

सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणूक येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जातो आहे,” असेही रोहित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, रोहित पवार यांनी याआधीच एक सविस्तर फेसबूक पोस्ट करत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती. रोहित पवार म्हणाले होते, “अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरुवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा.”

बातम्या आणखी आहेत...