आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षातील मित्र कोण?:रोहित पवार म्हणाले- भाजपच्या नेत्याचे नाव घेतले असते मात्र त्यांना बंधने, त्यांचा विचार करून नाव सांगत नाही!

बारामती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित पवार यांनी #AskRohitPawar या हॅशटॅगने नेटिझन्सला स्वत:ला कोणताही प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. अनेकांनी राजकारणापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत धमाल प्रश्न विचारले. मात्र विरोधी पक्षातील मित्र कोण? यावर रोहित पवार म्हणाले, भाजपमधील नेत्याचे नाव घेतले असते मात्र त्यांना बरीच बंधने आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करून नाव सांगत नाही. रोहित पवार यांचा भाजपमधील 'तो' मित्र कोण यावर आता चर्चांना उधाण आले आहे.

9 एप्रिलला रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवर #AskRohitPawar अंतर्गत सोशल मीडीयावर नेटिझन्सला प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांना विविध प्रकारचे प्रश्न नेटिझन्सने विचारले. रोहित पवार यांनीही मोकळीढाकळी उत्तरे दिली. आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित पवार यांनी सडेतोड उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले.

दादा मग कधी बसायचे?

कुळधरण येथील शिवसैनिक शरद क्षिरसागर यांनी यावेळी, महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत वैयक्तिक तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारला यावर रोहित पवार उत्तरले, जर नेत्यांनी ठरवले तर भविष्य नक्कीच चांगले आहे. तर एकाने चक्क दादा मग कधी बसायचे पार्टीला, यावर चला बसू की. फक्त तेवढे ग्लासमधे ब्लॅक कॉफी चालेल, असे मजेशीर उत्तर दिले.

देश कि पक्ष?

दिगु टिपणीस याने विचारले, तुमच्या बायोपिक करायचा झाला तर तुमच्या रोल बद्दल तुमची निवड कोण असेल. वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर, रोहित पवारांनी माझा रोल मलाच करायला आवडेल, असे उत्तर दिले. गणेश कांबळेने, देश कि पक्ष असा प्रश्न विचारला, यावर देश असे उत्तर पवारांनी दिले.

भाजपमधला कोणता नेता आवडतो?

रोहित पवार यांना भारतीय जनता पक्षातला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न एकाने विचारला. यावर रोहित पवारांनी ‘गडकरी साहेब’ असे दोन शब्दांत उत्तर देत नितीन गडकरी यांचे थेट नाव घेतले.

घरचे लग्नाला तयार नाही...

एका युवतीने आपले एका तरुणावर प्रेम असून घरचे लग्नाला तयार नाहीत, तर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्यामते मी काय करायला हवे? असा प्रश्न विचारला असता पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसे नक्की करा! असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.