आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीच्या लोकांवर आमचा विश्वास:बावनकुळेंच्या टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले- भाजप नेत्यांनो बारामती या, विकास बघा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश मधील अमेठी मतदार संघातून भाजपने हरवले आणि आता बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंना आम्ही हरवणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले. त्यावर आमचा बारामतीकरांवर विश्वास आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला.

शुक्रवारी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असताना त्यांनी मानाचा तिसरा गणपती गुरजी तालीम मित्र मंडळ समोर ढोल वादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी रोहित पवार यांनी संवाद साधला.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी म्हणाले की, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. आज बारामती पवार मुक्त करायची, मुंबई ठाकरे मुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकर्‍यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत.

बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा दावा करणार्‍या भाजपा नेत्यांना सुनावताना रोहित पवार म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे.

लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे

मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे. सुडाचे राजकारण थांबवावे. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावे, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.

लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे

मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे. सुडाचे राजकारण थांबवावे. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावे, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...