आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष वर्चस्व असलेले कसबा मतदारसंघ पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीने ढासळला असून काँग्रेसचा आमदार निवडून आणला आहे. पुणे शहरात या निवडणुकीच्या माध्यमातून बदलाचे वारे सुरू झाले असून आगामी लाेकसभा निवडणुकीत ही पुण्यात बदल झालेला दिसेल, असे मत काँग्रेसचे नेते राेहित टिळक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.
पाेटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना महायुती व महाविकास आघाडीने तिकिट नाकारले याबाबत ते म्हणाले, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधनानंतर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी भाजपकडून दिली जाईल, अशी मला अपेक्षी हाेती, त्यामुळे मी आघाडीकडून तिकिटाची मागणी केली नाही. मात्र, भाजपने टिळक कुटुंबियांना तिकिट का दिले नाही? याचे आश्चर्य आम्हाला वाटले. नेमकी काेणती कारणे यामागे आहे. याचे उत्तर भाजपचे वरिष्ठ नेतेच देऊ शकतील.
कसबा मतदारसंघातून मी दाेन वेळा निवडणूक लढली असून अनेक वर्ष वेगवेगळे पक्ष स्वतंत्ररित्या लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला हाेत हाेता. परंतु यंदा दुरंगी सरळ लढत झाल्याने तसेच मागील अनेक वर्ष काँग्रेस उमेदवार मतदारसंघात सामाजिक कामात सक्रिय असल्याने रविंद्र धंगेकर यांचा विजय सुकर झाला. भाजप विराेधात लाेक चिडून असल्याचे निवडणूक प्रचारात दिसून आले त्यामुळेच पक्ष, पैसे विसरुन त्यांनी काँग्रेस उमेदवारास पाठबळ दिले. ब्राम्हण समाजाची मते मतदारसंघात महत्वपूर्ण असली तरी मी निवडणुकीत उभा हाेताे तेव्हा आणि आत्ता सुध्दा सर्वच समाजांनी माेठया प्रमाणात मते दिली आहे. त्यामुळे केवळ एका समाजाकडे पाहून मतदान केले जाते, हे म्हणणे याेग्य नाही.
जनतेने निवडणूक हातात घेतली
कसबा निवडणुकीत खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्याचे सांगत राेहित टिळक म्हणाले, बापट यांचे भाजप पक्षा बाहेर इतरांशी चांगल्याप्रकारे संबंध असल्याने त्यांना पक्षाबाहेरील मतदानाची मदत मिळत हाेती. इतर पक्ष वेगवेगळे लढत असल्याचा फायदा ही त्यांना झाला. कसबा ही जुने वाडे, सांस्कृति कार्य यामुळे पुणे शहराची ओळख आहे. भाजपने याठिकाणी मतदारांना प्रलाेभन दाखविल्याचे मतदारांना रुचलेले नाही आणि त्यांनी निवडणूक हाती घेतली. कसबा विजयामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेसचा आमदार झाल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आगामी पुणे मनपा निवडणुकीत युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करु.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.