आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडी यांच्या वतीने मॉडेल उर्फी जावेदविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, याबाबत कोथरूड पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना सोमवारी तक्रार अर्ज देण्यात आला आहे. त्यावर संबंधित पोलिसांनी या संदर्भात योग्य तो तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
हे आहेत आरोप?
या तक्रारीनुसार आरोप आहेत की, मॉडेल उर्फी जावेद गेल्या अनेक दिवस सोशल मीडिया, इन्सटाग्राम, फेसबुक तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल पेहराव परिधान करून वावरत आहे. या कृतीमुळे व वावरण्याने समाजात एक प्रकारची अश्लीलता पसरत आहे. समाजातील लोकांना एक प्रकारची लज्जा निर्माण होऊन समाजात विपरीत परिणाम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पक्षाकडून आंदोलनाचा इशारा
यावर योग्य ती कारवाई न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदेश रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी च्या सचिव ॲड. अर्चीता जोशी यांनी सांगितले.
या संदर्भातील तक्रार अर्जाची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा, रुपाली चाकणकर अध्यक्ष महिला महिला आयोग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त पुणे शहर यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. अर्चिता मंदार जोशी, शुभांगी खंकाळ,रेखा चव्हाण,संगीता कांबळे, शोभा शिंदे, बाळासाहेब खंकाळ, ऍड आनंद कांबळे, भारत भोसले उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.