आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ जणांवर गुन्हा:पुण्यात ठेकेदाराचा साखर कारखान्याला 55 लाखांचा गंडा; मजूर न देता उचल घेऊन पैसे हडपले

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोडण्यासाठी मजूर हजर न करता स्वता: च्या फायद्याचा वापर करून ठेकेदाराने एका साखर कारखान्याची 55 लाख 78 हजार रुपयांची फसवूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी साखर कारख्यान्याचे सुपरवायझर राेहिदास बाजीराव माेकाशी (वय-45) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल

दत्ता साहेबराव चाैघुले , शुभम ममराज राठाेड , आबा नामदेव राठाेड चंद्रकांत लक्ष्मण दाैंडकर, दत्तात्र्य रंगनाथ गाडे, बाळासाे बापू गवारी, कृष्णा बाळासाे गवारी व प्रवीण दिलीप गायकवाड अशी गुन्हा दाखल जालेल्या आराेपींची नावे आहे. हा सगळा प्रकार 27 जुलै 2021 ते 03 ऑगस्ट 2021 या दरम्यान घडला होता. याबाबत शुक्रवार 10 जून रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय?

आठ आरोपींनी गळीत हंगाम 2021 ते 2022 करता वाहन मजूर टाेळ्याकरता कासरसाई साखर कारखानायांचे संचालक मंडळाकडे 28 जून 2021 ठराव क्रमांक नऊ, जून 2021 अन्वये करार करुन आगाऊ रकमेची उचल घेतली. मात्र, प्रत्यक्षात ऊस तोडण्याकरता मजूर हजर न करता स्वत:च्या फायद्याचा वापर करून कारखान्याची ५५ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहे

बातम्या आणखी आहेत...