आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:वैद्यकीय प्रवेशासाठी आठ लाखांचा गंडा

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका व्यक्तीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी पाटील (रा. वानवडी, पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मुग्धा ऊर्फ मिताली हेमंत कुलकर्णी (२८, रा. कल्याण वेस्ट, ठाणे) या वकिल महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनुसार, ही घटना नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान घडली. पाटील यांच्या मुलीला वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्यासाठी कुलकर्णीने पैसे लागतील असे सांगितले. आरोपीने पाटील यांच्याकडून ६ लाख २ हजार रुपये ऑनलाइनद्वारे व पुन्हा २ लाख उकळले. त्यानंतर पाटील यांच्या फोनला कुलकर्णीने उत्तरे देणे बंद केले. त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

बातम्या आणखी आहेत...