आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा प्रवेश सुरू:आरटीईचे प्रवेश 13 एप्रिलपासून सुरू होणार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना येत्या १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चित करता येणार आहे. अंतिम मुदत ३० एप्रिल राहणार आहे. पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर १२ एप्रिलला दुपारी ३ वाजतापासून प्रवेशाचे मेसेज पाठवण्यात येतील. प्रवेश प्रक्रियेत जिल्हानिहाय लॉटरी काढण्याची कार्यवाही सुरू असल्याने, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या समजू शकली नाही. यंदा राज्यभरातून १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६४ हजार ३९० इतके विक्रमी अर्ज आले आहेत.