आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीआय कार्यकत्याने मागितली 25 लाखांची खंडणी:नगरसेविकेस निवडणुकीत प्रतिमा मलीन करण्याची दिली धमकी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीर बांधकाम बाबत विरुध्द खाेटे अर्ज दाखल करुन येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत प्रतिमा मलीन करण्याची भिती घालून नगरसेविका मुक्ता जगताप व त्यांच्या पतीकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या विराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जितेंद्र अशाेक भाेसले (रा.विमाननगर,पुणे) या आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विमानतळ पोलिसठाण्यात अर्जुन धाेडिंबा जगताप (वय-45, रा.विमाननगर,पुणे) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार30/7/2020 ते 25/8/2022 यादरम्यान विमाननगर परिसरात घडल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली आहे. तक्रारदार अर्जुन जगताप यांच्या पत्नी मुक्ता जगताप या भारतीय जनता पक्षाकडून महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत नगरसेवक पदावर निवडून आलेल्या आहे. आराेपी जितेंद्र भाेसले याने तक्रारदार व्यवसायिक अर्जुन जगताप व त्यांच्या नगरसेविका पत्नी मुक्ता जगताप यांना त्यांच्या बेकायदेशीर बांधकाम बाबत विरुध्द खाेटे अर्ज दाखल संबंधित ठिकाणांवर करुन तुम्हाला अडचणीत आणू त्याचप्रमाणे आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुमची प्रतिमा मलीन करु अशी धमकी देत 25 लाख रुपये खंडणीची मागणी केली.

सदर खंडणीचे 25 लाख रुपये न दिल्यास जिवे ठार मारण्यात येईल अशी धमकी ही देण्यात आली. त्याचप्रमाणे अ‍ॅट्राेसिटीच्या खाेटया गुन्हयात अडकवून राजकीय आयुष्य अडचणीत आणण्याची धमकी देण्यात आली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर नगरसेविकेच्या पतीने याप्रकरणी विमाननगर पोलिसठाणे गाठत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत खंडणी विराेधी पथक दाेनचे पोलिस उपनिरीक्षक एस जाधव पुढील तपास करत आहे.

आरटीआय कार्यकर्त बनला खंडणीखोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र भोसले हा माहिती अधिकारात माहिती काढून त्याद्वारे लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले असल्याबाबत त्याने पुणे महापालिका व पीएमआरडीए येथे तक्रारी करुन नगरसेवक पद रद्द करण्याबाबत खोटे अर्ज केले होते. त्याच्या अर्जाची चौकशी होऊन अशा प्रकारे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता.

त्यानंतरही महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...