आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:नीट परीक्षेवेळी केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी; राज्य महिला आयोगाकडून दखल - रूपाली चाकणकर

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याची घटना देशभरात घडल्याचे प्रसारमाध्यमानी समोर आणले आहे. आपल्या राज्यातही सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणे अशा तक्रारी आल्या आहेत.याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

चाकणकर म्हणाल्या,याबाबत तक्रार दाखल झाल्याने सांगली मधील प्रकार समोर आला आहे. मात्र, ही परीक्षा संपूर्ण राज्य भरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बेपत्ता मुलींचा प्रकरणाचा आढवा घेणार

चाकणकर म्हणाल्या,महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढते आहे आणि ही बाब अतिशय चिंताजनक आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने पाच जानेवारी २०२२ रोजी पहिले पत्र हे हरवलेले व्यक्तींचे विभाग,मुंबई यांना पाठवले होते.त्यानंतरचा पत्रव्यवहार हा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बालविकास मंत्री, राष्ट्रीय महिला आयोग त्याचबरोबर आय.जी पीसीडब्ल्यूसी, पोलीस महासंचालक यांना केलेला आहे.यामध्ये राज्य महिला आयोगाच्यावतीने विविध स्तरावर प्रयत्न करत असताना याबाबत 'अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अवरनेस' प्रोग्राम देखील राबवण्यात आले.जेणेकरून यामध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या आणि त्यांचा तातडीने जर शोध लागला नाही, तर त्यांना मानवी तस्करीच्या जाळ्यामध्ये ओढणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.म्हणून यावर तातडीने उपाय करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने १५ मे रोजी दुपारी तीन वाजता आयोगाच्या कार्यालयामध्ये गृह सचिव यांनी स्वतः उपस्थित रहावे आणि या संदर्भातला आढावा सादर करावा असे सांगितले. ही अतिशय गंभीर बाब आहे

आणि यामध्ये पोलीस महासंचालक यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी असतील आणि हरवलेल्या व्यक्तींचे विभाग यांचे उपायुक्त यांनी देखील या संदर्भातला आढावा घेऊन उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.जेणेकरून एक स्वतंत्र समिती तयार करून या समितीच्या माध्यमातून विशेष तपास करत येईल आणि जेणेकरून तातडीने कारवाई महाराष्ट्र मध्ये करता येईल.