आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपाली चाकणकरांचा मुलगा अभि'नेता':पहिला मराठी चित्रपट 'विरजण'चे पोस्टर आले समोर

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चर्चेत आला आहे. तो राजकारणामुळे नाही तर चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय होताना दिसून येत आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. विशेष म्हणजे सोहमच्या पहिल्या चित्रपटाचे नावही समोर आले आहे.

'प्रेम' ही एक अशी भावना आहे जी कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येते. यामध्ये काहींचे नाते पूर्णत्वास जाते तर काहींना दुःख, अपयश पचवावे लागते. अशाच प्रेमाची कथा सांगणारा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'विरजण'.

सोहमच्या चित्रपटाचे 2 पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोहमसोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे या चित्रपटात झळकणार आहे. पोसटरवरुन असे दिसून येत आहे की, चित्रपटाची कथा एक लव्हस्टोरी आहे. चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. ​​​​​​​विरजण्मध्ये सोहमचा रोमँटिक अंदाजही या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहम आणि शिल्पा ठाकरे यांच्यासोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.

तर 'सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन'चे डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच 'विरजण' चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित राहून चारचाँद लावले.

बातम्या आणखी आहेत...