आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला तिकीट मिळाले नाही:अन् बारामती जिंकणार म्हणे...रूपाली ठोंबरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना डिवचले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे उपाध्यक्षा रूपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती लोकसभा निवडणूक जिंकणार असा दावा भाजपकडून करण्यात आला असून त्याला प्रत्युत्तर देताना स्वतःला पक्षात उमेदवारी मिळेना अन बारामती जिंकणार म्हणे...असे म्हणत त्यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

रूपाली ठोंबरे काय म्हणाल्या?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दौऱ्यावर येणार असे सांगताना भाजप हा मतदारसंघ जिंकेल असे म्हटले आहे. यावर रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, ज्यांना स्वत:ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ते बारामती जिंकणार होय, अशा शब्दांत त्यांनी मिशन बारामतीची खिल्ली उडवली.

बावनकुळेंचा निर्धार

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण पूर्णवेळ प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यांत सीतारमण 5 ते 6 वेळा बारामती दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहेत, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल, या दृष्टीने या दौऱ्यांमध्ये विचार करण्यात येईल. आगामी काळात बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडून आणू, असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...