आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:केंद्रीय सहकार मंत्रालयाचा महाराष्ट्रावर परिणाम नाही, केंद्राच्या निर्णयावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचे महाराष्ट्र राज्यावर परिणाम होतील असे वाटत नाही. कारण सहकार क्षेत्र राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले.

बारामती येथे पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार केला. त्यामध्ये सहकार क्षेत्र हे नवे मंत्रालय स्थापन करण्यात आले आणि त्या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयावरील प्रतिक्रिया मांडताना पवार म्हणाले, ‘सहकार चळवळ महाराष्ट्रात खोलवर रुजली आहे. तिला अनेक स्तर आहेत. शिवाय सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाकडे आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. त्या कायद्यांत केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. घटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे नव्या केंद्रीय विभागाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे पवार म्हणाले.

मल्टिस्टेट बॅँक हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मात्र, सहकार मंत्रालय हा विषय नवीन नाही. मी दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होतो. तेव्हाही सहकार हा विषय होता आणि आजही आहे. काही माध्यमांनी मात्र केंद्रीय खात्यामुळे राज्यातील सहकार चळवळीवर परिणाम होईल असे जे लावून धरले आहे त्यात तथ्य नाही, असेही पवार म्हणाले. समान नागरी कायदा केंद्र सरकारचा विषय आहे. सरकार जोवर निर्णय घेत नाही तोवर भाष्य करणे उचित होणार नाही. कारण निर्णयाचे अधिकार केंद्राकडे आहेत, असेही पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
महाराष्ट्रात आम्ही तीन पक्षांनी मिळून सरकारचा निर्णय केला आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि ते काँग्रेसकडेच राहील. इतर कुणी बोलायचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आम्हा तिन्ही पक्षांना मान्य आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे बोलताना शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याबाबत अनाैपचारिक चर्चा झाली असल्याचे सांगितले होते. त्यावर पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले.

... कारण हे क्षेत्र राज्य सरकारच्या अखत्यारीत
नाना पटोले लहान माणूस : काँग्रेस पक्षाचा स्वबळाचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जागोजाग वारंवार पुढे करत असल्याच्या मुद्द्याबाबत पवार यांनी खोचक टिप्पणी केली. ‘लहान माणसांविषयी मी काय बोलणार? जर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...