आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sahitya Akademi For The Children's Novel 'Piuchi Wahi', Which Was Created With The Intention Of Making Children Write Their Diaries

दिव्य मराठी विशेष:मुलांनी दैनंदिनी लिहावी या हेतूने साकारलेल्या ‘पियूची वही’ बालकादंबरीला साहित्य अकादमी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल व कुमार साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या बालकादंबरीला साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी विविध वाङ‌्मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार दिले जातात. बुधवारी २२ भाषांतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात मराठी भाषेतील पुरस्कार डॉ. बर्वे यांना जाहीर झाला आहे.

डॉ. बर्वे पाच वर्षांपासून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषवले आहे. ‘पियूची वही’ हा मुक्त संवाद आहे. रोजची दैनंदिनी लिहावी, तसे या बालकादंबरीचे स्वरूप आहे. मुलांचा त्यांच्या भवतालाशी, मित्र-मैत्रिणींशी, पालकांशी, शिक्षकांशी मनमोकळा संवाद घडावा, त्यातून नवे मराठी शब्द, अर्थ, लपलेले अर्थ, व्यवहारात भाषेचा वापर, कल्पनेचा वापर आणि उपयोजन याविषयी छोट्या दोस्तांना खेळीमेळीच्या वातावरणात काही सांगण्याचा प्रयत्न या लेखनाच्या माध्यमातून डॉ. बर्वे यांनी केला आहे.

डाॅ. संगीता वर्बे यांची साहित्यसंपदा : ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रानफुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘मिनूचे मनोगत’,उर्वरित. पान १०

मुलांनी लिहिते व्हावे हाच हेतू ^साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. मुलांनी लिहिते व्हावे, हाच या पुस्तक निर्मितीमागचा हेतू आहे. आणि तो हेतू साध्य झाला आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक आणखी जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. ते वाचून मुले रोजचा दिनक्रम लिहण्यास सुरुवात करतील. मुले मोठ्या संख्येने लिहिती होत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. - डॉ. संगीता बर्वे, लेखिका.

बातम्या आणखी आहेत...