आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंची पत्रकार परिषद:म्हणाले- गरीब मराठ्यांना देखील सरकारने आरक्षण द्यावे; फडणवीस सर्व जातीधर्मांचे

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहीहंडी हा एक राज्यस्तरीय खेळ केला जात असेल तर ती चांगली गाेष्ट आहे. पुणे, मुंबईत दहीहंडी माेठ्या प्रमाणात हाेत असते आणि त्याला राज्यस्तरीय खेळाचा दर्जा देण्यात गैर नाही. मात्र, त्याबाबत आरक्षण चार ते पाच टक्के देतात ती पण चांगली गाेष्ट परंतु जे गरीब मराठे आहे त्यांना देखील आरक्षण दिले पाहिजे हे सरकारने लक्षात ठेवावे, असे मत माजी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे.

संभाजीराजे म्हणाले, आम्ही जी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन केली आहे त्याबाबत काम करणे हेच माझे लक्ष्य आहे. काेण काेणत्या पक्षाबाबत काही बाेलते हा त्यांचा अंर्तगत विषय आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काेणत्या एका जातीचे नसून ते सर्व जातीधर्माचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाच वर्ष काम पाहिलेले आहे. आजही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे ब्राम्हण महासंघाने त्यांना पुण्यातून जातीच्या आधारावर लाेकसभेची पुण्यातून उमेदवारी मागितली असली तरी ते कोणत्या एका जातीचे होऊ शकत नाही. ते चांगले नेतृत्व असून सर्व समाजाचे लोक त्यांना पाठिंबा देतील. राजकारणाचा भाग हा राजकारण असतो. त्या त्या मिनिटाला त्या त्या वेळी वेगवेगळे आराखडे तयार होतात. सर्व संघटनातील लाेकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटना कार्यरत आहे. सामाजिक प्रश्न, गरजू लाेकांचे प्रश्न, मराठ्यांचे प्रश्न आदी गाेष्टीवर स्वराज्य संघटना काम करत आहे.

फडणवीस पालकमंत्री झाल्यास चांगले

पुण्यात एका कार्यक्रम निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येत जात असतात. त्यांना पुण्याचे पालकमंत्री झालेले पाहायला मला आवडेल. देवेंद्र फडणवीसांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला हा नागपूर आहे. ते नागपूरचे पालकमंत्री जरी असले, तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. असे असले तरी ते पुण्यात येत जात असतात. त्यामुळे ते पालकमंत्री झाले तर नक्कीच आवडेल असे त्या पत्रकारांनी फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नावर म्हणाल्या.

फडणवीस केंद्रीय समितीत

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय समितीत निवड झाली. या संदर्भात विचारले असता, त्या म्हणाल्या, मला महाराष्ट्र खूप आवडतो. मला याच राज्यात राहायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही महाराष्ट्रातच बघायला आवडेल, गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला अमृता फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला. दहिहंडी आपली परंपरा आहे. या उत्सवाला वाव मिळायला हवा, असेही फडणवीस यावेळी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...