आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस प्रश्नावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया:म्हणाले - महाराष्ट्रामध्ये यंदाचा साखर हंगाम आव्हानात्मक

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये यंदाचा साखर हंगाम आव्हानात्मक असल्याची कबुली सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुण्यात बोलत होते.

पाटील म्हणाले, राज्यात साखर कारखानदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणत वाढले आहे. ऊस हंगाम यंदा बरेच दिवस चालल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पाऊस चांगला झाल्याने ऊस क्षेत्र वाढेल अशी आगामी परिस्थिती आगामी काळात असणार आहे. शेतकरी, कारखाने यांच्यासमोर ऊस तोडणी प्रश्न निर्माण झाल्याने यावेळी ॲप तयार करण्यात आले असून, पुढील काळात त्याचा वापर करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हर्वेस्टर वाढवण्यात येणार

ऊस गाळप हंगाम 2021-22 बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, पांडुरंग शेळके उपस्थित होते. पाटील म्हणाले, साखर कारखानदार माध्यमातून हर्वेस्टर वापर वाढवण्यात येत आहे. हर्वेस्टर गरज लक्षात घेता त्याचे वाहतुकीचे दर वाढवण्यात आले आहे. कारखाने हर्वेस्टरला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने हर्वेस्टर खरेदीस अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे.

1 ऑक्टोबरला कारखाने सुरू

पाटील म्हणाले, आगामी हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. 25 हजार मेट्रिक टन ऊस क्षेत्र वाढलेले आहे. ऊस क्षेत्राशी निगडित लोकांनी सहकार्य दिल्याने विविध अडचणींवर मात करता आली. एक ऑक्टोबर रोजी यंदा कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सरासरी हंगाम यंदा 173 दिवस तर अधिकाधिक 240 दिवस चालला आहे. इथेनॉल उपक्रम हाती घेतल्याने त्याचे ही उत्पादन यावेळी वाढवण्यात आले आहे. देशात सर्वाधिक सहकार संस्था महराष्ट्रात आहे. केंद्राचा सहकार खात्यांतर्गत मोठ्या बँक नियंत्रणाखाली असून त्याची मदत केंद्र सरकारला मिळते आहे.

बातम्या आणखी आहेत...