आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खुनाचा उलगडा:संपत्ती नावावर करण्यासाठी बहीण- भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अघडकीस आली आहे. राहते घर स्वत:च्या नावावर करून देण्याकरता तगादा लावणाऱ्या भावाचा सख्ख्या बहीण-भावाने खून केल्याचा प्रकार समोर आला. मुख्य बाब म्हणजे या घटनेचा उलगडा पोलिसांकडून पाच वर्षांनी झाला. याप्रकरणी 4 संशयितावर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक केली आहे.

नक्की घटना काय?

पंकज दिघे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ सुहास दिघे, बहीण अश्विनी आडसुळ, प्रशांत व महेश बाबुराव धनावडे (वय-37) या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महेश धनावडे यास अटक केली आहे तर उर्वरित पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना 4 मार्च ते 17 मार्च 2017 मध्ये घडली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस हवालदार राजेंद्र नारायण मारणे (वय-54) यांनी आरोपीं विरोधात फिर्याद दाखल केली आहे. उघडकीस न आलेल्या गुन्हयांचा तपास युनिट तीनचे पथक करत असताना, त्यांना सदर गुन्हयातील कागदपत्रे प्राप्त झाली होती. चौकशीत प्राप्त झालेली कागदपत्रे व साक्षीदार यांचेकडे केलेल्या चौकशीत खून झालेला इसम पंकज दिघे हा त्याचा भाऊ सुहास दिघे व बहीण अश्विनी आडसुळ यांच्याकडे राहते घर स्वत:चे नावावर करण्याकरता त्रास देत होता.

भावाला मारण्याचा रचला कट

14 मार्च रोजी सायंकाळाच्या वेळेस पंकज यास आरोपींनी संगनमताने कट रचून मारहाण केली. त्यानंतर आरोपी महेश धनावडे याने त्याचे तवेरा गाडीत पंकज यास नेवून फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे उसाचे शेताजवळ असलेल्या कॅनॉल मध्ये ढकलुन दिले होते. याबाबतची माहिती आरोपींना माहिती असताना ही त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी 19 मार्च रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार 19 मार्च रोजी दिली. मात्र, पोलिस चौकशीत पंकज याची बॉडी कॅनॉल मध्ये 18 मार्च रोजी मिळून आल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांचा आरोपींवर संशय घेतला. त्यामुळे याबाबत सखोल तपास केला असता आरोपींनी कट रचून पंकज यास पाण्यात ढकलुन मारले.

बातम्या आणखी आहेत...