आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sale Of 6 day old Infants To Third Parties | A Case Has Been Registered Against The Jalgaon Father For Having Three Daughters In A Row, The Father And 2 Third Parties

6 दिवसांच्या चिमुकलीची तृतीयपंथीयांना विक्री:लागोपाठ तीन मुली झाल्याने जळगावच्या पित्याचे दुष्कृत्य

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका पाठोपाठ तीन मुली झाल्याने जळगावमधील एका निर्दयी बापाने आपल्या सहा दिवसांच्या मुलीची पुण्यातील दोघा तृतीयपंथीयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

पुण्यातील कर्वेनगर येथील संभाजीनगरमध्ये राहणार्‍या दोघा तृतीयपंथींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीला त्यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी विकत घेतले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी 23 सप्टेबर 2022 रोजी हे बाळ ताब्यात घेतले. जळगावमधील बापाकडून सहा दिवसांची ही मुलगी विकत घेताना त्यांनी दत्तक घेण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी या मुलीला विकत घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांना मिळाली माहिती

गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी जिल्हा बाल कल्याण समितीशी संपर्क साधून ही माहिती दिली. जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर तसेच सदस्य वैशाली गायकवाड, श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांनी याच्या देखभालीसाठी बालकाला एका संस्थेकडे सुपूर्त केले आहे. या दोघा तृतीयपंथींनी मुलगी दत्तक घेतल्याची कबुली दिली असून तिच्या आई-वडिलांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.

तपास सुरू

मुलीची विक्री करणारा बाप आणि खरेदी करणारे तृतीयपंथी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 80 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याबाबत पुढील तपास करीत आहेत.

कॉलद्वारे महिलेचा विनयभंग

व्हॉटसअ‍ॅपद्वारे अश्लिल व्हिडीओ कॉल करून महिलेचा विनयभंग करणाऱ्याला वारजे पोलिसांनी शिरूरूमधून अटक केली. सुधिर बापू कंधारे, (वय-20, रा. तरडोबाची वाडी, शिरुर, पुणे )असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेला आरोपी सुधीरने 16 सप्टेंबरला व्हॉटसअ‍ॅपद्वारे अश्लिल व्हिडिओ कॉल केला.

गुन्ह्याची दिली कबुली

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. पोलिस अंमलदार नितीन कातुर्डे व ज्ञानेश्वर गुजर यांनी तपास पथकाचे अधिकारी रामेश्वर पार्वे यांच्यासह शिरूर येथे जावून सुधीरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

याची कामगिरी

ही कामगिरी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, उपनिरीक्षक पार्वे, उपनिरीक्षक अमोल सावंत, प्रदिप शेलार, हनमंत मासाळ, धनंजय गिरीगोसावी, ज्ञानेश्वर गुजर, नितीन कातुर्डे यांनी केली.