आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:क्रिप्टोकरन्सीच्या बहाण्याने ‘सलमान’ची फसवणूक

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टोकरन्सी देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत ईश्वर गर्ग, नैना देवेंद्र जॉन असे फसवणूक केलेल्या बंटी -बबलीचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल वारी नझीर (३२, रा. पुणे) या तरुणाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची हकिगत अशी की, नैना देवेंद्र जॉन हिचा सलमान हा मित्र आहे. आरोपी नैना आणि विक्रांतने सलमानच्या ओळखीचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्याला दोघांनी मिळून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) देतो असे सांगितले.

यासाठी दोघांनी सलमानकडून वेळोवेळी तब्बल ९ लाख ३९ हजार ९३८ रुपये बँक खात्यातून ट्रान्सफर करून घेतले. काही दिवसांनंतर सलमानने दोघांना क्रिप्टोकरन्सीची मागणी केली. मात्र, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर सलमानला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब लष्कर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरोपी फरार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...