आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले यांच्या पुतळ्याला वंदन:सावित्रीबाईंमुळे महिलांना समाजात पुढे येऊन विकासात संधी मिळाली - डॉ. नीलम गोऱ्हे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजही समाजात मुलींवर अत्याचार, बालविवाह, मुलींना शाळेत न घालणे असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस (सुरक्षित आवार) या संकल्पनेवर काम होण्याची आवश्यकता दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कामामुळेच आम्ही इथवर पोहचलो आहोत. यामुळेच महिलांना समाजात पुढे येऊन विकासाची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना वंदन करीत आहोत, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या 109 व्या जयंती निमित्त पुण्यातील सारसबागेसमोरील पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या म्हणाल्या, ऐतिहासिक भिडे वाड्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा केल्यास अधिक उत्तम होईल. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात याविषयी मुद्दा उपस्थित झाला असताना याबाबत उच्च व तंत्रशिक्षण आणि शिक्षण विभागाने सकारात्मक कारवाई करण्याचे मान्य केले आहे. यासाठी लवकरच समाधानकारक पावले उचलली जातील असा विश्वास मला वाटतो आहे. खरंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेला स्मरून आम्ही सर्वजण हा विचार बळकट करण्यासाठी या विषयात काम करीत आहोत.

यावेळी शिवसेना पदाधिकारी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, अशोक हरणावळ नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर, श्रुती नाझिरकर, मनीषा धारणे,अश्विनी शिंदे, संगीता भुजबळ, आश्लेषा खंडागळे, अनुपमा मांगडे, स्वाती कथलकर, उषा पवार, अनिता शिंदे, अश्विनी शिंदे, आश्लेषा खंडागळे, शेलार गुरुजी, शेखर जावळे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...