आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य:संभाजी भिडेंचे पुन्हा प्रक्षोभक विधान, म्हणाले- 'इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू , झालं गेलं विसरून जा म्हणणारे नालायक!'

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी वादग्रस्त वक्त्याव्यामुळे चर्चेत येणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुण्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी औरंगजेबाशी तुलना मुस्लिम समाजाशी केली. तसेच, गावोगावी हा शत्रू नांदत असून त्याला पोटतिडकीने प्रत्युत्तर द्यावे, असे चिथावणीखोर वक्तव्यही त्यांनी केले.

शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त संभाजी भिडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना भिडे म्हणाले, 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले. मात्र, त्याची अंत:करणातील इच्छा वेगळी होती. औरंगजेबाला दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्व हिंदू संपवून टाकायचे होते. मात्र, तो ते करू शकला नाही. संभाजी महाराजांनीही मरण पत्कारले मात्र आपला धर्म सोडला नाही. त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या करून त्याने अंशत: समाधान मिळवले. मात्र, आजही हा औरंगजेब पाकिस्तान, बांग्लादेश आणि गावोगावी नांदणाऱ्या मुस्लिमांच्या रुपाने आपल्या समोर उभा आहे. त्यामुळे या शत्रुला त्याच पोटतिडकीने प्रत्युत्तर देण्याची ताकद आपण संभाजी महाराजांना श्रद्धांजली देऊन मिळवली पाहिजे.'

सुशिक्षित लोक हे नालायक वृत्तीचे!

कार्यकर्त्यांना संबोधित करताना संभाजी भिडे सुशिक्षित लोकांवरही चांगलेच भडकले. ते म्हणाले, 'सध्याचे काही सुशिक्षित लोक हे नालायक वृत्तीचे आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले. मात्र, ते आता जुने झाले आहे. उगीच जुने मुडदे का उकरून का काढायचे, असा सल्ला हे नीच लोक देत असतात. त्यामुळे देशविरोधी शत्रु फोफावतोय. याऊलट संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणे म्हणजे धर्माची, स्वातंत्र्याची उपासना करण्यासारखे आहे. आपण जुने न विसरता झालेल्या अत्याचारांचा सुड घेतला पाहिजे, असे भीडे म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही वाद

संभाजी भिडे यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चत आले आहेत. या वक्तव्यांमुळे अनेक वादही त्यांनी ओढावून घेतले. पाहूयात त्यांचे असेच काही वादग्रस्त वक्तव्ये

  • कोरोना हा काही रोग नाही, मुर्खच या रोगामुळे मरतात
  • देशातील डॉक्टर लुटारु, ते मारायच्या लायकीचे
  • कोरोनाच्या काळात 105 टक्के लोकांचा मृत्यू भीतीमुळेच झाला
  • आमच्या बागेत एक आंब्याचे झाड होते. ते आंबे खाल्ल्याने एका महिलेला मुलं झाली
  • सांगलीतील पत्रकार परिषदेत भिडे यांनी न्यायाधीशांबद्दलही अवमानजनक वक्तव्य केले होते.
बातम्या आणखी आहेत...