आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:संभाजी ब्रिगेडने भाजपसोबत युती करावी : मराठा सेवा संघ, परिणामांचा विचार करून निर्णय घेऊ : भाजप

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी “मराठामार्ग’ मासिकाच्या अग्रलेखामध्ये मांडली आहे. यामुळे राज्यात पुन्हा नव्या राजकीय समीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपने सावध भूमिका घेतली आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाकडून भाजपकडे युतीबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. युतीचे परिणाम काय होऊ शकतात, याची चाचपणी करून निर्णय घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मला माजी मंत्री म्हणू नका, ३ दिवसांत तुम्हाला कळेल
चंद्रकांत पाटील यांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी “माजी मंत्री’ असा उल्लेख केला. त्यावर पाटील यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन ते तीन दिवसांतच तुम्हाला समजेल, असे सूचक वक्तव्य केले. यामुळे राज्यातील राजकारणाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...