आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेड मैदानात:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार, प्रदेशाध्यक्ष  मनोज आखरेंची माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी ब्रिगेडने देशातील महाराष्ट्रातील लोकशाही वाचवण्यासाठी व पुरोगामी विचार संभाजी ब्रिगेड आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आम्ही एकत्र आलो, हा वैचारिक विचारांचा विजय आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढू असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे, प्रवक्ते गंगाधर बनबरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, डॉ. प्रदिप तुपेरे पुणे बार असोसिएशन‌चे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पहिला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी यांच्या गणपतींचे दर्शन घेतले त्याप्रसंगी आखरे यांनी मत व्यक्त केले.

सामाजिक क्रांतीचा संकल्प

आखरे म्हणाले, भविष्यात कार्यकर्त्यांच्या कष्टाच सोनं होईल. आम्ही समविचारी आणि किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत. 1966 ला संभाजी ब्रिगेडची सामाजिक परिवर्तनाचे कार्य करणारी संघटना म्हणून सुरुवात झाल्यापासून 2016 पर्यंत सामाजिक क्रांती करण्याचा संकल्प होता. महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता हा लढत राहिला.

सर्वसामान्य नागरिकांना न्याय

अ‍ॅड. मनोज आखरे पुढे म्हमाले, राजकारणाच्या माध्यमातून सत्ता ही काही घराण्यांची आणि श्रीमंत भांडवलदरांची बटीक होत आहे. सामान्य जनतेला सत्तेच्या वर्तुळातून दूर फेकले जात आहे. सामान्य जनता राजकारणाचा केंद्रबिंदू व्हावा म्हणून नोव्हेंबर 2016 पासून संभाजी ब्रिगेडने समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश केला व राजकीय पक्ष म्हणून स्थापना केली. आज शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परत एकदा संभाजी ब्रिगेडची मजबूत बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचा भगवा फडकवल्या शिवाय राहणार नाही.

ताकतीने लढू

आता झेंडा ही आमचा आहे आणि दांडा सुद्धा आमचाच आहे. हे महाराष्ट्रातील इतर पक्षांनी लक्षात घ्यावे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेना पूर्ण ताकतीने लढू व गणरायाच्या कॄपा आशीर्वादाने जिंकू असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...