आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहराच्या नामांतराची मागणी:औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यानंतर आता पुणे शहराचे नाव बदलण्याची संभाजी ब्रिगडची मागणी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याचे नामांतर 'जिजापूर' करा, संभाजी ब्रिगडचे संतोष शिंदे यांची मागणी

राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी विविध पक्षांकडून केली जात आहे. अशातच आता पुणे शहराचे नाव बदलण्याची नवीन मागणी केली जात आहे. पुण्याचे नामांतर जिजापूर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे. टीव्ही9 ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

संभाजी ब्रिगडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी पुण्याच्या नामांतराची मागणी केली आहे. जिजाऊंनीच उद्ध्वस्त झालेले पुणे पुन्हा वसवले. त्यामुळे पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. त्यामुळे पुणे शहराचे जिजापूर असे नामांतर करावे अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...