आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना:राजकीय वाटचालीसाठी संभाजीराजेंचे ‘स्वराज्य’, संघटनेसाठी राज्यभर दौरा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा खासदारपदाची सहा वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी नवीन पक्ष स्थापन करावा, अशी मागणी अनेक जण करत होते. परंतु आपण राजकीय वाटचालीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरा करून लोकांची मते जाणून घेत संघटनेचा कार्यविस्तार करणार आहोत. जुलै महिन्यात राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून त्यासाठी सर्व पक्षांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

संभाजीराजे म्हणाले, घरी कौटुंबिक वैभव असतानाही त्यात अडकून न पडता, केवळ समाजाच्या कामासाठी सन २००७ पासून मी राज्यभरात फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे विचार तळागाळापर्यंत पाेहोचवून लोकांकडून वेगळ्या प्रकारच्या राजकारणविरहित कामाची ऊर्जा मला मिळाली आहे. ६ वर्षांच्या खासदारकीदरम्यान राजकारणविरहित भूमिका मी घेतलेल्या असून अनेक विषय दिल्लीदरबारी मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सत्तेचा उपहोग केला तर समाजाचे कल्याण जलद गतीने, चांगल्या प्रकारे करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

तुळजापूर मंदिरातील प्रकार चुकीचाच
तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांना गाभाऱ्यात दर्शन घेण्यास विश्वस्तांनी विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी तुळजापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत संभाजीराजे म्हणाले, छत्रपती घराण्याची तुळजाभवानी प्रमुख देवी आहे. ब्रिटिश, निजामशहाच्या राजवटीत जे घडले नाही त्याचा अट्टहास आत्ता का केला जात आहे? प्रशासकीय लोकांनी प्रथम देवीच्या मंदिराचा इतिहास जाणून घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...