आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई-मालदीवमधून वसुली:भाजपसाठी समीर वानखेडे यांचा वसुलीचा धंदा; पुरावे देऊन तुरुंगामध्ये घालणारच : नवाब मलिक

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समीर वानखेडे हा एक नंबरचा बोगस माणूस आहे. ‘एनसीबी’च्या माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा त्यांनी चालवला आहे. या सगळ्यांचे पुरावे देऊन वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त॓े तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पिंपरीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. अमली पदार्थाच्या व्यापारात सामील असल्याच्या आरोपांवरून सुमारे नऊ महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली होती. साडेआठ महिने तुरुंगात राहिल्यावर त्यांना अखेर जामीन मिळाला. समीर खान यांना बोगस प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ‘माझ्या जावयावरील आरोप न्यायालयात सिद्धच होऊ शकले नाहीत. त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, मला त्रास देण्यासाठी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी माझ्या जावयाला जामीन मिळू दिला नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हे सगळे कटकारस्थान भाजपवाल्यांचे आहे. नटनट्यांवर बोगस गुन्हे दाखल करून हजारो कोटींची वसुली करण्याचा धंदा सुरू आहे. आम्ही हे सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही, असे मलिक म्हणाले.

वानखेडे यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे केली सादर
मलिक म्हणाले की, कोरोनाकाळात संपूर्ण चित्रपटसृष्टी मालदीव आणि दुबईमध्ये होती. समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. त्याचे मलिक यांनी मालदीवमधील वानखेडे यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे सादर केली. वानखेडे हे दुबई, मालदीवमध्ये होते का आणि त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये होती का, याचे उत्तर देण्याची मागणी मलिक यांनी केली.

सुशांतसिंग प्रकरणावर.. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली. लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले. ही वसुली मालदीव व दुबईमध्ये झाली, असा आरोपही मलिक यांनी केला.

कायदेशीर कारवाई करणार : वानखेडे
आपण दुबईत कधीही गेलो नव्हतो. नवाब मलिक हे मंत्री आहेत तरीही ते खोटे बोलत आहेत. एनसीबी करत असलेल्या कारवाईच्या कामात खूप अडथळा येत आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला. मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. त्यासाठी अधिकृत सुटी घेतली होती. त्याचे पैसेही मी स्वतः दिले आहेत. बहिणीसोबत मालदीवला गेलो नव्हतो, याचे पुरावेदेखील माझ्याकडे आहेत.

जस्मिन यांची मनसेकडून पाठराखण : मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात आज (ता.२१) मनसेने पत्रकार परिषद घेत जस्मिन यांची पाठराखण केली. तसेच जस्मिन वानखेडे यांच्यावर मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाहीत, असे मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...