आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका आज दुसरा टी-20 सामना:दुखापतीमुळे सॅमसनला विश्रांती; अमरावतीचा जितेश करणार पदार्पण!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा क्रिकेटपटू शिवम मवीने दमदार पदार्पणात भारतीय संघाच्या सलामीच्या टी-२० सामन्यातील विजयात माेलाचे याेगदान दिले आहे. याच सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धची मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. याच इराद्याने टीम इंडिया आज मैदानावर उतरणार आहे. गुरुवारी पुण्याच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-२० सामना हाेणार आहे.

गंभीर दुखापतीमुळे संजु सॅमसनला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी अमरावतीच्या यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माची निवड करण्यात आली. यातून ताे आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणार आहे. भारतीय संघाने विजयी सलामी देत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता पुण्यातील सामना हा श्रीलंका टीमसाठी निर्णायक मानला जाताे. यातील पराभवाने श्रीलंका संघावर मालिका गमावण्याची नामुष्की आेढवणार आहे. सध्या भारतीय संघ सर्वाेत्तम कामगिरीमुळे फाॅर्मात आहे. यामुळे भारतीय संघाचे या सामन्यातील विजयाचे पारडे जड मानले जात आहे. शिवम, दीपक हुडा, कर्णधार हार्दिक व उमरान मलिक हे फाॅर्मात आहेत. त्यांची सलामीच्या सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली.

बातम्या आणखी आहेत...