आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:पुण्याच्या तरुणाचा प्रयोग; सॅनिटरी नॅपकिनचे विघटन करणारे यंत्र केले तयार, राज्य सरकारही देणार प्रकल्पाला साथ

पुणेएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

महिलांना मासिक पाळीकरिता सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, संबंधित नॅपकिनचा वापर झाल्यानंतर ते पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात फेकले जाते आणि तसेच ते कचरा प्रकल्पात जाते. याेग्य प्रकारे नॅपकिन हाताळणी न केल्याने कचरावेचक महिलांना राेगराईचा सामना करावा लागताे. त्याचसाेबत जमिनीवरील प्रदूषण वाढणे, नॅपकिन जाळल्याने दुर्गंधी अशा समस्यांना सामाेरे जावे लागते. या सर्व गाेष्टी टाळण्यासाठी पुण्यातील एका तरुणाने अभिनव प्रयाेग राबवत, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन कशाप्रकारे विघटन करता येईल याचे संशाेधन करून नॅपकिन विघटनाची ‘सॅनिकाे’ मशीन तयार केली आहे. विघटन केल्यानंतर जे सेल्युलाेज, प्लास्टिक उरते त्याचा पुनर्वावापर करता येत असल्याने या प्रयाेगास महाराष्ट्र शासनाने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजिंक्य धारिया असे या तरुणाचे नाव असून २०१७ मध्ये त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात एका प्रकल्पावर काम करत असताना त्यास जाणवले की, ठिकठिकाणी सॅनटरी नॅपकिन कचऱ्यात फेकून दिले जात असून त्याचे विघटन करणारी काेणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. संबंधित नॅपकिन जाळून टाकल्याने विषारी धूर आणि दुर्गंधीचा सामना करावा लागताे आहे. नीती आयाेग, टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने २०१८ ते २०२० यादरम्यान नॅशनल केमिकल लॅबाेरेटरी (एनसीएल) मध्ये यादृष्टीने दाेन वर्षे संशाेधन करण्यात आले. प्रयाेगिक तत्त्वावर ‘सॅनिकाे’ या सॅनटरी नॅपकिनचे विघटन करणारे मशीन पुणे स्मार्ट सिटीच्या पाच बसेसमध्ये बसविण्यात आले आणि ३५० महिलांच्या मशीन वापराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या मशीनमध्ये नॅपकिन न जाळता, रासायनिक, मेकॅनिकल पद्धतीचा वापर करून त्याचे अवघ्या दहा मिनिटांत विघटन केले जाते.

पुणे, मुंबई, बंगळुरूमध्ये प्रकल्प राबवणार
अजिंक्य धारिया म्हणाला, महाराष्ट्र शासनासाेबत नुकताच करार करण्यात आला असून प्रयाेगिक तत्त्वावर पुण्यातील आैंधमधील आयटीआय येथे महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन गाेळा करून त्याचे विघटन आणि निर्जंतुकीकरण याेग्यप्रकारे केले जाणार आहे. याद्वारे दर महिन्याला जमिनीवर पडणारे अथवा कचऱ्यात जाणारे चार हजार ८०० नॅपकिन ‘सॅनिबिन’ मशीनद्वारे जमा करून ‘सॅनिकाे’ मशीनमध्ये त्याचे विघटन करून विघटित गाेष्टींचा पुनर्वापर केला जाईल. दरदिवशी १५०० नॅपकिन विघटित करण्याची क्षमता या मशीनची आहे. सध्या शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यालय यावर आम्ही लक्ष्य केंद्रित केले असून पुणे, मुंबई, बंगळूरू या शहरांत प्रकल्प सुरू होतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser