आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू; सर्व निर्णयात प्रमुख भांडवलदाराचे मत; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर देशाच्या सर्व निर्णयात प्रमुख भांडवलदाराचे मत घेतले जात असून त्यांच्या हाती लोकशाही गेल्याचा गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे दोघांचे माझ्या आयुष्यात सारखेच स्थान आहे. शरद पवारांना रात्रीच्या काळोखात भेटण्याची मला गरज भासली नाही. नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी मला उभे केले, घडवले मोठे केले. मात्र, शरद पवार हे मला नेहमीच आधारस्तंभ राहिले आहेत. मी सिल्वर ओकवर सरकार बनविण्यासाठी गेलो होतो हे सर्वांनी पाहिले.

भाजपने निर्णय बदलला

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप निवडणूक लढविली हे जरी खरे असले तरी 2014 साली आमचा काडीमोड झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो, 2014 साली त्यांनी युती तोडली होती. त्यांना वाटले आम्ही स्वबळावर देश काबीज करू, एक दोन जागेवर युती तोडली. मात्र आम्ही लढलोच. राज्याला स्थैर लाभावे म्हणून एकत्र आलो. त्यांनतर अमित शहा यांनी मातोश्रीवर येत लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला. यावेळी परळीमधील हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पॉवर स्टेअरिंग 50-50 असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावेळी बाजूला अमित शहा उद्धव ठाकरे आणि अनेक नेते बसले होते. निकाल लागल्यानंतर त्यांनी हे सर्व नाकारले, कारण त्यांना जागा जास्त मिळाल्या होत्या, त्यांनी आमच्या अनेक ठिकाणी जागा पाडल्या होत्या.

लोकशाही भांडवलदाराच्या हातात

संजय राऊत म्हणाले की, 2014 नंतर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न झाला, सध्याचे राज्यकर्ते हे स्वत:ला व्यापारी समजत आहेत. व्यापारी नेहमीच स्वत:चा फायदा बघत असतो, त्याप्रमोणेच लोकशाहीचे सर्व स्तंभ विकत घेतलेले आहेत. न्यायालयापासून व़त्तपत्र आणि संसदेपर्यंत त्यांनी मालकीहक्क प्रस्थापित केला आहे. हुकुमशहा हे असेल वागत असतात, भांडवलदाराच्या हातात ही लोकशाही जात आहे. देशाच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात सत्ताधारी आणि भांडवलदार यांचे मत असल्याचे दिसून येत आहे. घटनात्मक संस्था ही केंद्र सरकारची गुलाम झाली आहे. त्या मृतदेहसारख्या पडल्या आहेत.

हिंदू - मुस्लिम दंगलीचा फायदा घेतात

संजय राऊत म्हणाले की, देशात कोर्ट विकत घेतलल्या जात आहे, स्वत:ला चाणक्य म्हणणारे सर्व निर्णय करतात. मात्र, 2024 मध्ये सत्तापरिवर्तन झालेले असेल. लोक शांत आहेत म्हणजे त्यात लोकांच्या मनात मोठी खदखद आहे. देशभरात भाजपकडून हिंदू - मुस्लीम दंगली तयार करत निवडणूक लढविली जाते. देशात हिंदू - मुस्लीम वाद तयार करत निवडणुकीला फायदा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भाजपचे हिंदुत्व बोगस

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे बोगस हिंदुत्व आहे. त्यांनी हे हिंदुत्व चोरले आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, देश एक राहिला पाहिजे, देश सर्व जाती धर्मांचा राहिला पाहिजे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, आणि इराक आणि इराण हे धार्मिक राष्ट्र झघले पण तिथे वातावरण कसे आहे. 2024 साली महाराष्ट्रात आम्ही EVM ला नकार देणार आहोत. बांग्लादेशमध्येही बॅलेटवर निवडणूक होणार आहे. रिमोट वोटिंग म्हणजे रिमोट भ्रष्टाचार आहे. कागदावर आमचा विश्वास आहे.

शिवसेना ही कायम ठाकरेंचीच

संजय राऊत म्हणाले की, सध्याच्या राजकारण्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, त्यांना मराठी माणूस गुलाम आहे असे वाटते. मुंबईला कंगाल करत तिला लुबाढण्याचा प्रयत्न सुरू आहे, मुंबई मनपात सर्वात मोठा पक्ष ठाकरे हाच आहे. त्यांच्यापासून जोडलेली माणसे तुटू शकत नाही. पक्ष आणि चिन्ह गेले तरी काही फरक पडत नाही. पक्ष जागेवर आहे. 40 ते 50 लोक केवळ पक्ष सोडून गेले. निवडणूक आयोगाने नाही तर शिवसेना लोेकांनी तयार केली आहे. त्याच लोकांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख केले.