आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराचा आरोप:भीमा पाटस साखर कारखान्यात 550 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग, संजय राऊत थेट सीबीआयला पाठवणार पत्र

बारामती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात 550 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. बारामती दौऱ्यावर असेलेले संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी राऊत आता थेट सीबीआयला पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यात मी लवकरच जाणार आहे. मी भीमा पाटस साखर कारखान्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले. भ्रष्टाचार करणाऱ्यांना माझी अडचण होते. त्यामुळे आम्ही त्यांना काही प्रकरण देत आहोत. शेतकऱ्यांच्या लुटीची, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही? असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

सीबीआय आमच्या मागे लागते

संजय राऊत भीमा पाटस कारखान्या प्रकरणी सीबीआय डायरेक्टर यांना पत्र पाठवणार आहेत. याबाबत ते म्हणाले, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हे या राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचे अत्यंत घाणेरडे प्रकरण आहे. याठिकाणी 550 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. सीबीआय फक्त आमच्या मागे लागते. असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

राहुल कुल यांच्यावर आरोप

याआधी संजय राऊत यांनी ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याप्रकरणी पत्र पाठवले होते. या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.