आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप विरुद्ध मविआ:आमदारांना विक्री करण्यासाठी बाजारात उभे करणार का? दरेकरांचा राऊतांना खडा सवाल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केला तेव्हाच अर्ज माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे संजय राऊत हे आमदारांना बाजारात विक्री करण्यासाठी ठेवणार आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते पुण्यात बोलत होते.

राऊत यांनी भान ठेवावे

दरेकर म्हणाले, आमदार हे तीन ते साडेतीन लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ती बिकाऊ गोष्ट नाही याचे भान राऊत यांनी बोलताना ठेवावे. तसेच राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार शिवसेनाच करेल. कारण ते सत्तेत आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यादृष्टीने प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने दिला आणि विधान परिषद निवडणुकीत सहकार्य करू सांगितले. मात्र, हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही.

राज्य सरकारने कर कमी करावा

दरेकर म्हणाले, महागाई संदर्भात केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यांनी इंधन वरील कर कमी केला आहे. त्याचसोबत गॅस वरील दर कमी केली आहे. कोरोना संकट, रशिया आणि युक्रेन युद्धमुळे काही प्रमाणात महागाई वाढली आहे. सरकारला एक लाख कोटी रुपयांचा महसूल इंधन दर कमी केल्यामुळे सोडावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेल दर भाजप शासित राज्यात स्थानिक सेस कमी केल्यामुळे कमी झाले आहे. पण महाराष्ट्रात राज्य सरकार कोणतेही कर कमी करत नाही. अर्थव्यवस्था देशाची मजबूत आहे.

करारा जबाब देणार

दरेकर म्हणाले, ज्ञानव्यापी मशिदीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पुराव्या आधारे न्यायालय जो निर्णय देईल. ती आम्हाला मान्य आहे. काश्मीरमधील पंडितांच्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकार लवकरच 'करारा जबाब' माध्यमातून देईल.

रोहित पवार यांनी जपून बोलावे

आमदार रोहित पवार यांनी स्व. गोपीनाथ मुंडे हे जिवंत असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य केले आहे. याबाबत दरेकर म्हणाले, हयात नसलेल्या व्यक्ती बद्दल बोलून वाद सुरू करणे महत्त्वाचे नाही.पवार कुटुंबीयातील कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे हे पहिले रोहित पवार यांनी जाहीर करावे. अजित पवार, सुप्रिया सुळे हे उमेदवार आहेत का रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्री पदाची ओढ आहे. घरातला विषय जो आहे म्हणून एक उमेदवार निश्चित करा आणि मग आमच्या हयात नसलेल्या मुंडे साहेब यांच्या विषयी बोला. हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करून वाद निर्माण करायला रोहित पवार अजून लहान आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...