आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू मुसेवाला खून प्रकरण:संशयित संतोष जाधव, सौरभ महाकाल लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात; पोलिसांची माहिती

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलदीप सरांगल यांनी आज पत्रकार परिषद घेत संतोष जाधवच्या अटकेबाबत सविस्तर माहिती दिली. - Divya Marathi
अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलदीप सरांगल यांनी आज पत्रकार परिषद घेत संतोष जाधवच्या अटकेबाबत सविस्तर माहिती दिली.

पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून महाराष्ट्रातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची नावे माध्यमातून पुढे आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले आहे. दोघांच्या चौकशीदरम्यान, दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. मुसेवाला प्रकरणात त्यांचा नेमका काय सहभाग होता, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खुनाची आधीच माहिती होती

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांना मुसेवाला खुनाची आधीच महिती होती, अशी बाब समोर आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलदीप सरांगल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, संतोष जाधव याने पोलिसांपासून लपण्यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस काढून स्वतःचा पेहराव बदलला होता, अशी माहिती सरांगल यांनी दिली.

महाकालच्या माहितीवरून सुगावा

संतोष जाधव याच्यासोबत रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ सूर्यवंशी यासही रविवारी अटक करण्यात आली. यापूर्वी अटक केलेल्या महाकालने दिलेल्या माहितीवरून जाधव याचा सुगावा लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिश्नोई टोळीत आरोपी कसे सहभागी झाले. त्यांच्या संपर्कात राज्यातील इतर कोण व्यक्ती आहे, याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. बिश्नोई टोळी पाच ते सहा राज्यात कार्यरत आहे. त्यामुळे इतर राज्यातील पोलिसांशी समन्वय साधून कारवाई करण्यात येत असल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी सांगितले.

भुजमधून घेतले ताब्यात

पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित आणि पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ओंकार बाणखेले खून प्रकरणातील आरोपी सौरभ महाकाल पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला संगमनेर येथून अटक केली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान त्याचा साथीदार संतोष जाधव याचा ठावठिकाणाबाबत माहिती मिळविण्यात येत होती. जाधव याच्या तपासासाठी गुजरात, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली मध्ये शोधपथके गेली होती. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संतोष जाधव गुजरातमध्ये भुज जिल्ह्यात नगौर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुजरातमध्ये तपासासाठी गेलेल्या पथकाने संतोष जाधव याचा ठावठिकाणा घेत त्यास जेरबंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...