आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:साताऱ्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खून; पुण्याच्या वारजे माळवाडी येथील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भंगार विक्रीचा व्यवसाय करायच्या भाजी मंडईजवळ त्यांची दुकान होती आणि त्या तिथेच राहत होत्या.

साताऱ्यातील सहायक पोलिस निरीक्षक (API) यांच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी येथे उघडकीस आला. शाबाई अरुण शेलार (वय 65, रा. रामनगर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.

वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलिस दलामध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शाबाई यांचा व्यवसाय होता. त्या भंगार विक्रीचा व्यवसाय करायच्या भाजी मंडईजवळ त्यांची दुकान होती आणि त्या तिथेच राहत होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या व्यक्तीने पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याविषयी माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच रामनगर येथे मोठा जमाव जमला. काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या घटनेनंतर तेथे वाद झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

बातम्या आणखी आहेत...