आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.
संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.
कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. आज त्या निवडी होणार होत्या. मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांचे निवड करण्यात आली. सचिव पदावर कोणालाही संधी देण्यात आली नाही.
विठ्ठल शिवणकर यांनाच सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड 27 मे रोजी पुण्यात होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची वाढती संख्या आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी भाषणातून केले होते .
त्यानुसार आगामी काळात सचिव पदासाठी माजी सनदी अधिकारी आणि साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला स्वतः विकास देशमुख हजर होते. आज नेमण्यात आलेले उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष
जयश्री चौगुले वाशी, अरुण कडू पाटील उरण, एडवोकेट राम कांडगे पुणे, महेंद्र लाड पलूस.
आजीव सेवक प्रतिनिधी
प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, विनोद कुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे.
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
अॅड. भगीरथ शिंदे, माजी मंत्री अजित दादा पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, अॅड.रवींद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकू कोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्राध्यापक सदाशिव कदम आणि धनाजी बलभीम पाटील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.