आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा ते पुणे जुना कात्रज घाटात एकेरी वाहतूक:नवीन कात्रज बोगद्यातून दरीपूलमार्गे वाहतूक, रस्ते कामामुळे निर्णय

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

आदेशानुसार आजपासून 31 डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक आता नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता होती. हा धोका लक्षात घेत प्रशासनाने या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार 3 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

पुणे मोटार वाहन कायदा 1988 व गृह विभागाच्या 19 मे 1990च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...