आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबाबदारी:आयपीएस पत्नी वर्क फ्रंटवर, तर पती होम फ्रंटवर; साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी यांचे पती निभावत आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : झाडलोट, जेवण, भांडी घासणे, पत्नीचा युनिफाॅर्मही इस्त्री करत आहेत पती किशोर रक्ताते

मंगेश फल्ले 

देशात आजही बहुतांश महिलांना चूल अाणि मूलपुरतेच मर्यादित ठेवले जाते. मात्र, या गाेष्टीला छेद देत सातारा पाेलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांचे पती किशाेर रक्ताते यांनी नवा आदर्श मांडला आहे. लाॅकडाऊनच्या काळात पत्नी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असताना किशाेर हे घराची स्वच्छता, जेवण बनवणे, भांडी घासणे, पत्नीचा युनिफाॅर्म इस्त्री करणे, मुलीचे अावरणे, तिला खाऊपिऊ घालणे, तिच्याशी खेळणे अशा घरकामातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. 

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अायपीएस अधिकारी तेजस्विनी यांच्यावर कामाचा ताण वाढलेला आहे. काेराेनाची लागण हाेऊ नये म्हणून त्या महिनाभरापासून स्वत:च्या साडेपाच वर्षांच्या चिमुरडीला कुशीत घेणेही टाळत आहेत. 

घरातील कामगारांना दिली सुटी 

किशोर हे जनता कर्फ्यूच्या अादल्या दिवशी तेजस्विनींकडे साताऱ्याला गेले अाणि लाॅकडाऊन जाहीर झाल्याने तेथेच थांबले. प्रत्येकालाच काेराेनाची भीती असल्याने त्यांनी घरातील स्वयंपाकी, अाॅर्डर्ली यांना सुटी देत स्वत:च सर्व कामाची जबाबदारी घेतली. घरातील अावराअावर, झाडलोट, नाष्टा-स्वयंपाक, भांडी- कपडे, मुलीचे पालनपोषण, पत्नीचे कपडे व्यवस्थित ठेवणे, इस्त्री करणे अशा सर्व गाेष्टी ते अानंदाने करत अाहेत. त्याचा व्हिडिअाे तेजस्विनी यांनी साेशल मीडियावर टाकत पतीचा अभिमान असल्याचे सांगितले. 

मुलगी रडते, भावनिक हाेते, परंतु लांब राहते 

तेजस्विनी म्हणाल्या, लेकीला हा अाजार भयानक असल्याचे जाणवत अाहे. मी तिच्यापासून त्यामुळे दूर राहते तेव्हा मला ती तुझीही काळजी घे, असे प्रेमाने सांगते. परंतु, महिनाभरापासून मी तिला समाेर दिसत असूनही जवळ घेत नसल्याने अनेकदा ती रडते, हट्ट करते, भावनिक हाेते, कधी धावत येते; परंतु समजावून सांगितल्यावर दुरावा बाळगते.

बातम्या आणखी आहेत...