आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतीतून आशा जागवूया:जीवन वाचवणे खूप समाधानाचे काम; अनेकांना आधाराची गरज- आत्महत्या रोखण्यासाठी 'सर्वायव्हर सपोर्ट'

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, सोशल मीडियासह अन्य गोष्टीचे व्यसन, खुंटलेला संवाद, त्यातून आलेले एकाकीपण आणि नैराश्यातून थेट आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. आत्महत्येच्या या विचारापासून परावृत्त करण्यासाठी 'कनेक्ट' महत्वाचा असतो. गेल्या 17 वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देण्याचे काम पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था करत आहे.या चळवळीत आणखी लोकांनी येण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अर्णवाज दमानिया आणि कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काजरी मित्रा यांनी केले आहे.

दमनिया म्हणाले, यंदा 'कृतीतून आशा जागवूया (क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन) हा नारा आम्ही दिला आहे. मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी 2005 मध्ये 'कनेक्टिंग ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो आणि त्यातून आत्महत्येचा विचार येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळाला, मन मोकळे करता आले तर त्यातून या व्यक्ती स्वतःला सावरू शकतात.

नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय चौकशी, कायदेशीर दोषारोप /चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो. कोणताही पूर्वग्रह नसलेली, स्वच्छ मनाने एकून घेणारी कोणी व्यक्ती मन मोकळे करण्यासाठी मिळाली नाही, तर भावनांचा कोंडमारा होतो. व्यक्ती गुदमरून मनाने कोलमडते व ते सारे असह्य झाल्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होते. तथापि जर त्यापूर्वी त्यांना मन मोकळे करता आले, भावनांचा निचरा झाला व भावनिक आधार मिळाला तर अशा व्यक्ती सावरू शकतात व टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त होऊ शकतात आणि एक जीव वाचू शकतो. या करिता 'कनेक्टिंग'तर्फे डिस्ट्रेस हेल्पलाईन चालू करण्यात आलेल्या आहेत.

9922004305/9922001122 या क्रमांकांवर तणावग्रस्त व्यक्ती बोलू शकतात. आठवड्याचे सातही दिवस, दुपारी 12 ते रात्री 8 संपर्क करता येतो.कॉम्प्यूटरचे युग असल्याने ई-मेल द्वारे मदत मागण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिलेला आहे. connectingngo@gmail.com या ई-मेलद्वारे सल्लाही दिला जातो. दोन्ही प्रकारात ओळख व माहिती गुप्त ठेवली जाते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

सर्वायव्हर सपोर्ट' उपक्रम

तणावग्रस्तांना भावनिक आधार देण्याबरोबरच आत्महत्येचा प्रयत्न करूनही वाचलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि आत्महत्या घडलेल्या घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आसपासची कुटुंबे यांनाही धक्का बसलेला असतो व सावरण्यासाठी आधाराची गरज असते, हे ओळखून 'कनेक्टिंग ट्रस्ट'ने 'सर्वायव्हर सपोर्ट' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. अशा अस्वस्थ व्यक्तींनी 8484033312 या नंबरवर एसएम्एस पाठवावा. स्थेकडून त्यांना फोन येतो व फोनवर बोलण्याची वेळ ठरवली जाते. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असते, असे काजरी मित्रा यांनी सांगितले.

एक जीवन वाचवणे खूप समाधान देऊन जाते. बऱ्याच लोकांना आधाराची गरज असते. आपण सर्वानी एकमेकांशी हात मिळवत, आधार देत जीवन वाचवण्याचा प्रयत्न करूया आणि अनेकांना आपण आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो असे मत त्यांनी मांडले.आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग ट्रस्टबरोबर काम करू इच्छिणाऱ्यांनी अक्षत भयाणी यांना 7030230033 वर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...