आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Savitribai Fule University Pune | Savitri Bai Fule Statue In University Gate | Marathi News | Governor Unveils Life size Statue Of Savitribai Phule At Pune University

पुतळ्याचे अनावरण:​​​​​​​सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्माधर्मात भांडणे लावू नका, मात्र ऐकतो कोण ? ठाकरेंचा विरोधी पक्षांना टोला ​​​​​​​

“अनेक वर्षांपूर्वी फुले दांपत्याने सांगितले होते, धर्माधर्मामध्ये थोडीही भांडणे लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी धर्माधर्मामध्ये भांडणे लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका, असा संदेश समाजाला दिला. आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर त्याबाबत बोलतो. पण हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार? कोण हा विचार पुढे नेणार?, असा टोला ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधी पक्षांना लगावला. या कार्यक्रमात मान्यवरांनी सावित्रीबाई फुलेविषयी आपले विचार मांडले.

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना संधी : डॉ. नीलम गोऱ्हे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणि तत्त्वचिंतक होत्या. सावित्रीबाई फुले लिंगसमानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या वेळी म्हणाल्या.

सावित्रीबाईंनी रूढीवादी प्रथा संपवल्या : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक पुढारपणात फुले दांपत्याचे योगदान मोठे आहे. सावित्रीबाईंनी रूढीवादी प्रथा संपवल्याबद्दल भारत देश त्यांचा सदैव ऋणी राहील.

केवळ ४८ तासांत परवानग्या मिळवल्या : मंत्री उदय सामंत सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी सहा महिन्यांचा कालावधी विविध परवानग्या घेण्यासाठी लागणार होता, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हे काम आम्ही ४८ तासांत पूर्ण केले. प्रत्येकाच्या आयुष्यात काही भाग्याचे क्षण येतात त्यातील हा क्षण माझ्याही आयुष्यात आला आहे, असे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

फुले दांपत्याने अविस्मरणीय कामे केली : मंत्री छगन भुजबळ १८७६ ते ८३ या काळात महात्मा फुले हे पुण्याचे आयुक्त होते. त्या वेळी त्यांनी शाळा, रस्ते, घरोघरी पाणी, रॉकेलचे दिवे अशी अनेक कामे केली होती. फुले दांपत्याने केलेली कामे अविस्मरणीय आहेत.

आजचे युग जाहिरातबाजीचे : मुख्यमंत्री फुले दांपत्याने त्या काळात दुष्काळात अन्नछत्रे काढली. आपण काय करतो? आपण म्हणजे सर्वांबद्दल बोलत आहोत. एखाद्या पक्षाबद्दल बोलत नाही. आजचे युग हे जाहिरातबाजीचे आहे. आपण काही केले तर बॅनरबाजी करतो. जाहिरातबाजी करतो. हे करावे लागते. नाही तर मते कशी मिळणार? केवळ माझा देश आणि समाज निरोगी असावा हाच त्यांचा हेतू, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जेव्हा जेव्हा मला विविध विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान कार्यक्रमासाठी बोलवण्यात येते, तेव्हा तेव्हा “मेडल’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक असते. त्या वेळी मला खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा प्रत्यय येतो, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

1500 किलाे ब्राँझचा पुतळा सावित्रीबाई फुले यांचा हा पुतळा १५०० किलोचा ब्राँझचा असून याची उंची साडेतेरा फूट आहे, असे राजेश पांडे यांनी सांगितले. पुतळा उभारणी समिती, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने हे काम इतक्या कमी कालावधीत होऊ शकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद देशमुख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...