आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम:पालकांसाठीही आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वर्ग; तज्ज्ञांकडून धोरण समजून घेण्याची संधी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वूमीवर शिक्षणात, शिक्षण पद्धतीत, अध्यापन आणि मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ घातले आहे. त्यांच्यापर्यंत या बदलांची आणि या बदलांमधील विचारांची माहिती प्रभावीपणे पोहोचावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाने अभिनव उपक्रम राबवला आहे.

संलग्न महावद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्रातील हा पालक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शनाचा पहिला अभिनव प्रयोग असणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली.

या विषयाची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक रविंद्र शिंगणापूरकर, अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही सर्वसमावेशक पद्धतीने प्रत्येक घटकाची बाजू, म्हणणे लक्षात घेऊन करण्यात यावी या उद्देशाने हा अभिनव प्रयोग विद्यापीठ करत आहे.

रविंद्र शिंगणापूरकर म्हणाले, ६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू व आयसीटी, मुंबई येथील प्राध्यापक डॉ.आर.डी.कुलकर्णी तसेच जळगावच्या एम.जे.महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.अनिल राव आदी मान्यवर यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMs3hOn3KIOqt0Wb4OzETiewKl8D6W6c9nt6SFWXmLtUO32w/viewform या लिंक गुगल फॉर्म भरून विद्यार्थी व पालक यात सहभागी होऊ शकतात. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही सहभागी होता येणार आहे.