आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न:विद्यापीठात मानव्य विद्या, सामाजिक शास्त्रे अभ्यास केंद्राच्या माध्यमातून संशोधन प्रकल्प सादर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदव्युत्तर पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजावी, या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे आंतरप्रणाली अभ्यास केंद्रातर्फे सुरू झालेल्या संशोधन प्रकल्प उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यापीठातील अनेक विभागातील जवळपास ५० विद्यार्थी विविध विषयांवर आपले संशोधन प्रकल्प सादर करीत आहेत.

कोरोना काळात विद्यार्थ्यांनी घरी रिकामे न बसता कोणत्या ना कोणत्या विषयावर अभ्यास करावा या हेतूने आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मागील वर्षीपासून पदव्युत्तर पदवी (एम. ए.) च्या विद्यार्थ्यांसाठी हा संशोधन प्रकल्प उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमानुसार या विद्यार्थ्यांनी कोणताही एक विषय निवडत त्यावर संशोधन करत आपले सादरीकरण करायचे असते. मागील वर्षी हे सादरीकरण ऑनलाईन स्वरूपात झाले होते तर यावर्षी प्रत्यक्ष विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत हे संशोधन सादरीकरण सुरू आहे. विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाच्या सभागृहात दिनांक ३ व ४ फेब्रुवारी हे दोन दिवस हे सादरीकरण होत आहे. या संशोधन परिषदेच्या आयोजनात स्त्री आणि लिंगभाव अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. अनघा तांबे यांचा मुख्य सहभाग होता.

याबाबत अधिक माहिती देताना आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ.राजेश्वरी देशपांडे म्हणाल्या, आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या १५ विविध विभागांचा समावेश आहे. या अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन तयार होण्यास मदत होते. तसेच पदव्युत्तर पदवीच्या स्तरावरच त्यांच्यात संशोधनपर अभ्यास करण्याची वृत्ती, संस्कृती निर्माण होते. या सादरीकरणादरम्यान ज्या चर्चा होतात त्यात विद्यार्थी, अभ्यासू व्यक्ती आणि प्राध्यापक सर्व जण सहभागी होत अनेक विषयांवर चर्चा करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास होण्यास मदत होते.

या दोन दिवसीय संशोधन प्रकल्प उपक्रमात यंदा ५० विद्यार्थ्यांनी साधारण २५ संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. यासाठी त्यांना विद्यापीठ स्तरावरून संशोधन अनुदान देखील देण्यात आले आहे असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...