आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बनावट कॉल सेंटरमधून कर्जाच्या आमिषाने गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाज इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून शून्य टक्के दराने कर्ज मंजुरीच्या आमिषाने राज्यभरातील नागरिकांना गंडा घालणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा दत्तवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून ४० मोबाइल, ७ टीबी क्षमतेच्या कॉम्प्युटरच्या ११ हार्डडिस्क, १ एनव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दानेश रवींद्र ब्रीद (२५ रा. अंबरनाथ वेस्ट, ठाणे) व रोहित संतोष पांडे (२४ रा. वागळे इस्टेट, ठाणे) यांना अटक केली. याप्रकरणी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुला-मुलींना पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

माहितीनुसार, कर्जाच्या अामिषाने फसवणूक झाल्याची दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पथकाने तांत्रिक माहितीनुसार मुंबईतील मुलुंड परिसरातील आरोपीची माहिती मिळवली. त्या वेळी आरोपीच्या कॉल सेंटरमध्ये ४३ जण काम करत असल्याचे यावेळी दिसून आले. पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आणि इतर मुद्देमाल जप्त केला. पथकाने तांत्रिक तपास करुन हा पर्दाफाश केला.

बातम्या आणखी आहेत...