आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिकता:पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड देण्यासाठी योजना, जलयुक्त शिवार याेजना पुन्हा नव्याने सुरू करणार : देवेंद्र फडणवीस

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक शेती हा महत्त्वपूर्ण विषय आहे. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या आपल्या शेतीला विज्ञानाची जाेड आहे. परंतु नंतरच्या काळात आपण माेठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरण्यास सुरुवात केली आणि शेतीची चक्रीय अर्थव्यवस्था बदलली. शेतमालाचा भाव वाढला असला तरीदेखील आपला उत्पादन खर्च वाढत असल्याने शेती ताेट्यात जाते. येत्या काळात जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यातील बालेवाडी स्टेडिय आचार्य देवरत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलाेत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित हाेते.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक शेती कशा प्रकारे करता येईल या दृष्टीने सन २०१५-१६ पासून ही याेजना सुरू केली आहे. राज्यआणि केंद्र सरकारच्या याेजना एकत्रित करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अाणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनची मुदत वाढवण्यात येऊन काही जिल्हे या याेजनेत समाविष्ट करण्यात येतील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी याेजनेद्वारे गावात वेगवेगळ्या कृषी अाधारित याेजना राबवल्याने साडेचार हजार काेटी रुपये जागतिक बँकेने आपल्याला अर्थसाहाय्य दिले. स्मार्ट प्रकल्प दहा हजार गावांत २१०० काेटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचे बाजारपेठेशी साखळी सक्षमीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांना मुख्य अडचण आहे की, त्यांच्या मालास अपेक्षित भाव न मिळता मधील दलालांना अधिक भाव मिळताे.

दहा लाख हेक्टर सेंद्रिय शेतीचे लक्ष्य वातावरण बदलाचा शेतीवर परिणाम हाेत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हाेते. जलयुक्त शिवारमुळे ३९ लाख हेक्टर जमीन अाेलिताखाली आली असून २७ टीएमसी पाणी साठवू शकलाे. पुन्हा आपण जलयुक्त शिवार याेजना सुरू करत असून आता प्रत्येक गाव जलसंवर्धनयुक्त असेल. सन २०२५ पर्यंत दहा लाख हेक्टरवरील सेंद्रिय शेती २५ लाख हेक्टरपर्यंत नैसर्गिक शेतीखाली आणावी असे लक्ष्य ठेवण्यात यावे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

सेंद्रिय शेतीसाठी आर्थिक पाठबळ देणार : पाटील महाराष्ट्रात साडेअकरा काेटी लाेकसंख्या असून ५२ टक्के लाेकसंख्या शेतीवर अवलंबून अाहे. सेंद्रिय शेतीवर आपण भर दिला पाहिजे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष देताना जे उत्पन्न कमी हाेते त्याचा काही भाग अनुदानाच्या स्वरूपात देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. काेणतीही गाेष्ट याेजना दिल्याशिवाय हाेत नाही. नागरिकांना सेंद्रिय शेती करताना त्याच्या मालाची किंमत जास्त ठेवता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडून बाजारमूल्याने धान्य खरेदी करून ते कमी किमतीत लाेकांना देण्यासाठी शासनाने काही आर्थिक पाठबळ द्यावे लागेल. सध्या सर्वांचे आराेग्य महत्त्वपूर्ण असून सामान्य माणसाच्या हिताकरिता सेंद्रिय शेतीचा माल उपलब्ध करून देणे महत्त्वपूर्ण आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...