आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर:आक्षेप असल्यास 'या' संकेतस्थळावर अर्ज करता येणार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परीक्षेची इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी गुरुवारी सांगितले आहे.

अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये 'ऑब्जेक्शन ऑन क्व पेपर अँड आन्सर की' या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्यासाठी 18 ते 28 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 28 ऑगस्ट 2022 नंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

अर्ज स्वीकारण्यात येणार

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्तीबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी 18 ते 28 ऑगस्ट 2022 पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही आयुक्त दराडे यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...