आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगावधान:सातारा शहराजवळ स्कूल बस पेटली; पोलिसामुळे वाचले प्राण!

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसने अचानक पेट घेतल्याची घटना सातारा-कोरेगाव रस्त्यावरील खावली गावानजीक घडली. चालत्या स्कूल बसमधून धूर येत असल्याची बाब चालकाच्या लक्षातही आली नव्हती. मात्र, ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलिसाने प्रसंगावधान दाखवत चालकाला बस थांबवायला लावत क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन कोरेगावकडे निघालेल्या स्कूल बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन वायरिंग जळाले. त्यामुळे बसच्या खालच्या बाजूने धूर येऊ लागला. बसने अचानक पेट घेतला. मात्र, ही बाब चालकाच्या लक्षात आली नव्हती. सुदैवाने ड्यूटी संपवून घरी निघालेल्या एका पोलिसाला बसमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबवून विद्यार्थ्यांना खाली उतरवले.

बातम्या आणखी आहेत...