आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:शालेय बस 100 फूट दरीत कोसळली; आठ जण गंभीर

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव, घोडा येथील मुक्ताई प्रशालेची सहल ही गिरवली येथील आयुकाची दुर्बीण पाहायला गेली होती. दरम्यान, परत येत असताना ही बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी १२.३० वा. घडली.

गिरवली येथील आयुकाची दुर्बीण उंच डोंगरावर आहे. येथे जाणारा रस्ता नागमोडी वळणाचा आहे. मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक ही दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, परतताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने बसमधून मुलांना बाहेर काढले. यात ८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. काही मुलांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल केले. येथे उपचार सुरू आहे.