आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • School Of 65 Teachers Of Pune Zilla Parishad; Less In Teaching, Action Will Be Taken If The Teacher Fails In The Examination |marathi News

दिव्य मराठी विशेष:पुणे जिल्हा परिषदेच्या 65 शिक्षकांची शाळा; शिकवण्यात कमी, परीक्षेत शिक्षक नापास झाल्यास होणार कारवाई

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत असताना शिक्षकांनी तुम्हाला पाढे पाठ करायला सांगितले असतील. या सोबतच गृहपाठही करायला लावले असतील. तुम्हाला जर पाढे नीट म्हणता आले नसतील, तर शिक्षक तुम्हाला नक्कीच रागावले असणार. शिक्षक विद्यार्थ्यांना बोलू शकतात, पण शिक्षकांनाच काही येत नसेल तर? जरा विचित्र वाटतंय ना! पण हे खरं आहे. विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना घडवणारे काही शिक्षकच शिकवण्यात कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे शिक्षक ज्या शाळांत आहेत, त्या शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा आहेत. जवळपास ६५ शिक्षकांना काही येत नसल्याने पुणे जिल्हा परिषद आता या शिक्षकांची “शाळा’ भरवणार आहे. जर, या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुणे म्हटले की विद्येचे माहेरघर अशी ओळख पुढे येते. या बिरुदावलीत शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेचे हे शिक्षकच शिकवण्यात कमी पडले असून आता त्यांना पुन्हा शिकवण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ४१० आदर्श शाळांमध्ये पालकमंत्री शिक्षण सुधार कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत या आदर्श शाळांमधील ३ हजार ४३० शिक्षकांचे अध्यापन कौशल्ये तपासण्यात आली.

प्रत्येक शिक्षकाला शिकवण्यासाठी जवळपास ४० मिनिटे वेळ देण्यात आला. यात त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यास सांगण्यात आले. त्याचे मूल्यमापन करण्यासाठी खासगी, सरकारी तज्ज्ञ, तसेच एनजीओचे प्रतिनिधी या वर्गात उपस्थित होते. मात्र, या परीक्षेत ६५ शिक्षक नापास झाले. त्यांची कामगिरी अतिशय सुमार असल्याचे सिद्ध झाले. मात्र, या परीक्षेत २९७९ शिक्षक हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. तर २५१ शिक्षक हे पहिल्या वर्गात तर १५१ शिक्षक हे दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले.

६ ते १० जूनदरम्यान प्रशिक्षण
या शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी आता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत ६ ते १० जूनदरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. या आदर्श शाळांवर जवळपास ९६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. असे असूनही काही शिक्षक त्यांचे मुख्य काम असलेलले ज्ञानार्जनाचे काम व्यवस्थित करत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

१ लाख १५ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न
पुणे जिल्ह्यातील या आदर्श शाळांमध्ये जवळपास १ लाख १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शिक्षकांना सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. त्यांना ६ ते १० तारखेदरम्यान प्रशिक्षण दिले जाईल. यात ते नापास झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले. दौंड, मुळशी, खेडमध्ये सर्वाधिक शिक्षक तर दौंड १०, खेड १४ तर मुळशीत १३ शिकवण्यात कमी पडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...