आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:अल्प उपस्थितीत शाळा भरली, खासगी शाळांकडून प्रतिसाद नाही; आठवडाभरात परिस्थिती सुधारण्याचा अंदाज

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे, नाशिक, नागपुरात विद्यार्थ्यांची कमी संख्या

कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी पहिल्या दिवशी अगदी अल्प संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच प्रामुख्याने महानगरपालिकेच्या शाळांचीच घंटा वाजल्याचे दिसून आले. बहुतेक खासगी शाळा अद्याप बंदच आहेत. महानगरपालिकेच्या ज्या शाळा सुरू करण्यात आल्या, तिथे सुरक्षेचे सर्व नियम सांभाळण्यात आल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसत होते.

शहरात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्राधान्याने सुरू करण्यात आले आहेत. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा तुरळक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सोमवारी सुरू झाल्या. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत विविध आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत.

पुणे मनपाच्या ४४ पैकी २३ शाळा सुरू: पुणे व परिसरात सोमवारी शाळा सुरू झाल्या. मनपाच्या ४४ पैकी २३ शाळा सुरू झाल्या आहेत. २२ शाळा मंगळवारी सुरू होणार आहेत. नववीत १३६, १० वीच्या वर्गात २२६ आणि बारावीच्या वर्गात ३२ विद्यार्थी उपस्थित होते.

नागपूरमध्ये पालकांचे संमतिपत्र होते आवश्यक
नागपूर| कोरोनाच्या सावटात धास्तावलेल्या वातावरणात आणि काहीशा साशंक मनाने उपराजधानी नागपुरातील महापालिका क्षेत्रातील शाळा सोमवारी सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांचे संमतिपत्र आणणे अनिवार्य होते. पहिल्या दिवशी मोजकेच विद्यार्थी आले होते. त्यांना डिस्टन्सिंगचे पालन करत वर्गात बसवण्यात आले.

नाशिकमध्ये २५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
नाशिक| नाशिकमध्ये मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग यासोबत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला गेला. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या नाशिक जिल्ह्यातील १३२४ एकूण शाळांपैकी ८४६ शाळा सरू झाल्या. मात्र, इयत्ता नववी व दहावीच्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी केवळ २० ते २५ टक्के उपस्थिती राहिली.

आमचे सुरक्षेला प्राधान्य
मनपाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत पालकांचे संमतिपत्र असणे बंधनकारक आहे. मनपाचे पथक शहरातील सर्व शाळांची पाहणी करणार आहे. आठवडाभरात खासगी शाळाही सुरू होतील. - शिवाजी दौंडकर, मनपा शिक्षण अधिकारी (माध्यमिक)

बातम्या आणखी आहेत...